वनस्पती काय असतात?www.marathihelp.com

हालचाल करू न शकणाऱ्या बहुपेशीय सजीव वनस्पतींमध्ये झाडे, झुडपे, वेली, शेवाळे व कवक यांचाच समावेश होतो असा सामान्य समज आहे, परंतु तो तितकासा बरोबर नाही. प्रत्यक्षात स्पाँजसारखे प्राणीही हालचाल करू न शकणारे बहुपेशीय सजीव आहेत. या उलट समुद्रात तरंगणारी एकपेशीय शेवाळी ह्यांनाही वनस्पती समजले जाते. याखेरीज आता कवकांचा एक वेगळाच गट बनवला आहे. त्यांना वनस्पती गणले जात नाही.

वनस्पतीची व्याख्या ही 'पुढील दहा गुणवैशिष्ट्ये असलेले उद्भिज‍ सृष्टीतील सजीव' अशी करावी : प्रकाशातील ऊर्जा वापरून स्वतःचे अन्न उत्पादन करण्याची क्षमता म्हणजे अन्न साखर व स्टार्च या रूपात साठवणेकडक पेशीभित्ती पेशींमध्ये केंद्रकाचे अस्तित्वबहुधा बहुपेशीय, परंतु क्वचित एकपेशीयही असू शकतातअमर्याद वाढीची क्षमता सामान्यतः, पण नेहमीच नाही, पकड ठेवण्यासाठी मुळे, आधारासाठी खोड व अन्न तयार करण्यासाठी पाने यांचे अस्तित्व प्राण्यांहून बाह्य उद्दीपनांना अतिशय हळू प्रतिसाद मर्यादित हालचाली आलटून पालटून बीजाणू आणि पराग व अंडपेशी यांचे उत्पादन.

वनस्पतींत शेवाळी, शैवाल, नेचे, आणि अपुष्प (उदाहरणार्थ सूचिपर्णी वृक्ष) व सपुष्प वनस्पतींचा समावेश होतो. झाडे अनेक प्रकाराची असतात. काही झाडाना फुले असतात. काही झाडाना फुले नसतात.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 13:36 ( 1 year ago) 5 Answer 5090 +22