वर्णनात्मक निबंध म्हणजे काय?www.marathihelp.com

निबंधाचे प्रकार :

सुभाषितपर निबंध
 चिंतनात्मक निबंध 
चर्चात्मक निबंध 
चरित्रात्मक निबंध 
कल्पनाविलासात्मक निबंध 
कथनात्मक निबंध
 वर्णनात्मक निबंध


वर्णनात्मक निबंध म्हणजे काय

आपण बघितलेल्या एखाद्या प्रसंगाचे, प्राण्याचे, वस्तूचे, माणसाचे ,दृश्याचे किंवा वास्तूचे यथासांग वर्णन करणे ,यालाच वर्णनात्मक निबंध म्हणतात.

वर्णनात्मक निबंधाचे लेखन कसे करावे?

आपण ज्या विषयी लिहितो आहे मग तो प्रसंग ,प्राणी किंवा इतर काहीही असो. त्यामधील सर्व बारकाव्यांचा अगदी सविस्तरपणे तपशील वर्णनात्मक निबंधामध्ये देणे अपेक्षित असते.
उदा-
समजा आपण वाघा विषयी वर्णनात्मक निबंध लिहित आहोत, तर वाघामधील कौशल्य याबरोबरच त्याचे दोषही आपल्याला निबंधामध्ये सांगणे गरजेचे आहे.

एखाद्या व्यक्तीचे वर्णन लिहीत असताना त्या व्यक्तीच्या गुणांसह त्यामधील दोष देखील लिहायला हवेत.
  
निबंधाची भाषा इतकी साधी सोपी व आकर्षक असावी ,की ज्या व्यक्तीचे वर्णन आपण करत आहोत ,त्याचे चित्र वाचकाच्या डोळ्यासमोर उभे राहायला हवे.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:06 ( 1 year ago) 5 Answer 5379 +22