वाचन अधिक महत्वाचे आहे का?www.marathihelp.com

वाचनाचे महत्व | Importance of Reading  
 
ज्ञान संपादनासाठी  

दैनंदिन जीवनात वाचनाचा होणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्ञान संपादन होय. आज इंटरनेटच्या युगात आपल्या विविध सोशल मीडियाद्वारे लोक ज्ञान पाजळताना दिसत असली तरी अजूनही ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथांना आणि वाचनाला पर्याय झालेला नाही. आणि तो होणारही नाही. 

आज कुठलाही विषय असूद्यात त्याबद्दल पुस्तके उपलब्ध आहेत. अगदी भाजी बनवण्यापासून ते विमान बनवण्यापर्यंतच्या जवळ जवळ सगळ्याच विषयांवर आपल्याला पुस्तक पाहायला मिळते. कुठल्याही विषयाची अगदी मुळातून माहिती घेण्यासाठी पुस्तकासारखा दुसरा पर्याय नाही. हा! त्यांचे वाचन करण्यासाठी वेळ देणेही महत्त्वाचे आहे. 

मेंदूला व्यायाम 

वाचनाचा आपल्या मेंदूवर काय परिणाम होतो याबद्दल मानवी मनाला सुरुवातीपासूनच कुतुहूल राहिलेले आहे. हा परिणाम पाहण्यासाठी बऱ्याच वेगवेगळे प्रयोग करून पाहिलेत. संशोधनांनी हे सिद्ध केलं आहे कि वाचन मेंदूतील जाळ्यांना उद्दीपित करते त्यांना बळकट बनवते. 
एका प्रयोगामध्ये संशोधकांनी काही लोकांना एक कादंबरी वाचायला दिली. आणि ती वाचत असतांना त्यांच्या मेंदूच्या प्रतिक्रियांचे निरीक्षण केले. कादंबरी मध्ये जेव्हा एका विशिष्ट क्षणाला ताण निर्माण होत होता त्यावेळी मेंदूची त्याला प्रतिक्रियाही तेवढीच बळकट मिळत होती. थोडक्यात बोलायचे झाल्यास वाचनाने मेंदू असे काही विकर स्रवत होता जे त्याने खऱ्या परिस्थितीत स्रवले असते. 

एकाग्रतेत वाढ होते. 

नियमित वाचनाचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे वाचनाने एकाग्रता वाढते. आज सोशल मिडीआयने बरबटलेल्या या जगात आपल्या एकाग्रतेचा कालावधी कमी कमी होत चालला आहे. १५-३० सेकंदांचे विडिओ पाहून पाहून एखाद्या गोष्टीवर आपले मन केंद्रित करण्याची शक्तीही १५- ३० सेकंदाचीच उरात आहे आता. 

एकावेळी अनेक काम करीत जगण्याची आपल्याला लागत असलेली सवयसुद्धा आपली केंद्रित होऊन काम करण्याची शक्ती नष्ट करीत आहे.हे असे असतांना आपल्याला फक्त वाचनच वाचवू शकते. नियमित वाचन करणे आणि ध्यान करणे या एकमेकींना पूरकच गोष्टी आहेत. 
ज्यावेळी आपण एखादे पुस्तक वाचत असतो त्यावेळी आपण त्यातील मुख्य विषय नेहमी डोक्यात दहरुन समोर जात असतो. वाचन चालू असतांना पुस्तकाच्या मुख्य विषयाशी निगडित गोष्टींसाठी आपली शोधयात्रा सुरु असते. आपण पूर्णतः सजग असतो. हि सजगता एक प्रकारे ध्यानधारणाचं आहेएखादी कादंबरी वाचतांनासुद्धा तेच घडते. एरवी काही क्षण एका ठिकाणी थांबणारे आपले मन एखाद्या कादंबरीच्या कथानकात ते काही गुंतून जाते की वेळ कसा निघून गेला हे आपल्याला काळात नाही. आणि वाचलेलं बरच काही लक्षातही असतं. मृत्युंजय बाबत तर हि बाब मला वैयक्तिकरित्या जाणवलेली आहे. मला अजूनही आठवते की सहसा १० -१५ मिनिटे एका ठिकाणी न बसणारा मी जवळ जवळ सलग ४-५ तास खुर्चीला चिकटून बसलो होतो. 


संवाद कौशल्यात वृद्धी 

ज्यावेळी आपण वाचन करतो त्यावेळी नवे शब्द , नव्या संकल्पना आपल्या डोक्यात रुजू होतात. हे नव्याने आपल्या डोक्यात निर्माण झालेले विचार आपल्याला कुठल्याही परिस्थितीत स्वतःला योग्यरीत्या प्रदर्शित करण्यास मदत करतात. 

आपले संवाद कौशल्य सुधारण्यास वाचन कसे मदत करते याचा आपण एखाद्या व्यक्तीच्या उदाहरणावरून अभ्यास करू. कल्पना करा की तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलात आणि तेथे सगळे अनोळखी आहेत. मात्र संवाद हि मानवी मनाची भूक आहे. ती भागवण्यासाठी लोक एकत्र येतीलच. मग लाख असो कि नसो. 

आता साधारणतः लोकांच्या बोलण्याचा विषय असतो सध्याची परिस्थिती. देशात काय चाललंय, जगात काय चाललंय? यावरच सहसा चर्चा रंगतात. मग अश्या ठिकाणी जर तुमचे वाचन भरपूर नसेल, तुमच्याकडे माहिती नसेल तर आपण आपोआपच समूहामध्ये फक्त एखाद्या मूकपत्राची भूमिका घेऊन ऐकत राहतो. 

त्याच ठिकाणी जर आपण वृत्तपत्रे, पुस्तके, मासिके अश्या वेगवेगळ्या गोष्टींतून जगाची, आजूबाजूची माहिती ठेवली तर आपल्या मनाला ना पटणाऱ्या मुद्द्यांचा प्रतिवाद आपण करू शकतो.सोबतच आपली मते मांडून काही मित्रही कमावू शकतो. कारण अश्या ठिकाणी first impression is last impression असते.  

मानवाच्या सांसारिक जीवनातही वाचनाचे खूप महत्व आहे. एक चांगला वाचक मानसिकरीत्या आधीच प्रत्येक संकातून पार झालेला असतो. कुठल्या बाबीला कसे हाताळावे याची त्याला पुसत का असेना पण कल्पना आलेली असते. 

संशयातून संसार उद्ध्वस्त होता होता वाचवणाऱ्या नायकाविषयी एखादी कथा कादंबरी आधीच वाचली असणारा व्यक्ती स्वतःच्या जीवनातही त्या कथेतील सूत्रे आजमावून पाहतोच.निदान त्याला असल्या समस्येपासून दूर कसे राहायचे हे तरी कळलेलं असते.

किंवा अश्यावेळी स्वतःच्या मनाला कसे सांभाळायचे, जोडीदारावर काय परिणाम होऊ शकतो याची जाणीव त्याला असते. त्यामुळे त्याचा संसार थोडाबहुत तरी सुरक्षित असतो. 

स्त्रीवादी साहित्याची ओळख असणारा माणूस आपल्या पत्नीला कमी लेखनार नाही.त्याला सध्याच्या परिस्थितीची जाणीव आणि जगात चालू असणाऱ्या चळवळीची माहिती असतांना तसे करण्यासाठी त्याचे मानाचं ग्वाही देणार नाही.  

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 14:13 ( 1 year ago) 5 Answer 3649 +22