शंभर वर्षापूर्वीचे गाव कसे होते?www.marathihelp.com

१. महाराष्ट्र हा प्रदेश खरोखरच महाराष्ट्र आहे. जितकी विविधता महाराष्ट्रात दिसूनही तितकी अन्य राज्यात दिसून येत नाही.

२. महाराष्ट्रात मुंबई, कोंकण , देश , दखन . मराठवाडा, खान्देश , वऱ्हाड, विदर्भ आणि चंद्रपूर गडचिरोली आणि मेळघाट सारखे बरेच प्रदेश येतात.

३. महाराष्ट्रातील देशातून घाटमाथा ओलांडला कि तळकोकण ह्यामध्ये बरीच तफावत आढळून येते.

४. प्रत्येक प्रदेशाची एक आगळीवेगळी बोली आहे. पुण्यातील हडपसर आणि मावळ ह्यातील भाषा, खाद्यसंस्कृती आणि चालिरीत्या ह्यात बराच फरक आहे.

५. महाराष्ट्राच्या विविध प्रदेशात वेगवेगळे धान्य पिकतात त्यामुळे तेथील लोकांच्या खाद्यसंस्कृतीवर त्याचा परिणाम आढळून येतो. कोकणात भातशेती होते त्यामुळे तेथील लोक भात आणि तांदळाच्या भाकरी आवडीने खातात. सोलापूर ते कोल्हापूर ह्या पट्ट्यात ज्वारी पिकात असल्यामुळे त्यांच्या खाण्यात ज्वारीची भाकरी आवर्जून खाण्यात येते. पूर्व विदर्भात भातशेती होते तिथे भात खाल्ल्या जातो मात्र तांदळाच्या भाकरी तेथील लोक खात नाहीत. देशात गव्हाचे पीक होत असल्यामुळे मध्य महाराष्ट्रात गहू, ज्वारी, मका, बाजरी, नाचणी , वरी इत्यादींचा प्रयोग बऱ्याच प्रमाणात होतो. नागपूर विभाग हा आधी मध्य प्रदेशात असल्यामुळे तेथील संस्कृती हि उत्तर भारतीयांशी मिळतीजुळती आहे. तेथील डाळ बाटी आणि रेशमी रोटी प्रसिद्ध आहे.

६.महाराष्ट्राला खूप मोठा सागरकिनारा असल्यामुळे कोकण भागात मासे आणि सी फूड म्हणजे कोळंबी, खेकडे, झिंगे इत्यादी प्रामुख्याने खाल्ल्या जातात. कोल्हापूरला तांबडा आणि पंधरा रस्सा तर नागपूरकडे सावजी मटन आवडीने खाल्ले जाते. खान्देशात मात्र वांग्याचे भरीत म्हणजे एक पर्वणी असते. मराठवाड्यात टमाट्याची चटणी आणि शेवभाजी आवडीने खाल्ल्या जाते. पुण्यात पुरणपोळी, श्रीखंड , पंचामृत , इत्यादी प्रसिद्ध आहेत.

७. वरील पदार्थ शंभर वर्षाआधी प्रचलित असलेत तरी आजसुद्धा सर्वच पदार्थ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध असतात आणि अगदी आवडीने खाल्ल्या जातात.

८. महाराष्ट्र आणि ताकाची कढी ह्यांचे खूप जुने नाते आहे. कढीशिवाय महाराष्ट्रीय जेवण अपूर्ण असते. आधीच्या काळात कढी द्रोणात वाढून घेऊन पुरक मारून खाल्ल्या जात होती. पुरक मारून कढी खाण्याची लज्जत वेगळी होती. हल्ली पारंपरिक कढीचे स्वरूप पालटले असून आता तिला वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. भाजी घालून केलेली कढी , पालेभाज्या जसे पालक, चाकवत, शेपू इत्यादी भाज्या घालून केलेली कढी तर कधी निव्वळ बेसनाचे पीठ आणि दही घालून घट्ट कधी वाटीत घेऊन चमच्याने खाल्ल्या जाते.

९. मराठी जेवणात ठेचा, करवंद, अंबाडी, कवठ, कोकम, खोबरे, पुदिना, कोथिंबीर इत्यादी प्रकारच्या चैतन्य, कोशिंबिरी ह्यांचा आवर्जून समावेश केल्या गेला असतो.

१०. त्याचप्रमाणे मराठी जेवणात दही, ताक, कोकम कढी किंवा सोलकढी ह्यांचा सुद्धा समावेश असतो.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:59 ( 1 year ago) 5 Answer 3257 +22