सामाजिक मानसशास्त्राचे संस्थापक कोण आहेत?www.marathihelp.com

प्लेटो आणि ⇨ ॲरिस्टॉटल ह्या तत्त्वज्ञांनी सामाजिक जीवनातील प्रश्नांचा विचार केला होता. त्यानंतर

सामाजिक मानसशास्त्र
( सोशल सायकॉलॉजी ). सामाजिक–सांस्कृतिक संदर्भांत मानवी वर्तनाचा शास्त्रशुद्घ अभ्यास करणारी मानसशास्त्राची एक शाखा वा उपक्षेत्र. सामाजिक मानसशास्त्राची बीजे प्राचीन तत्त्ववेत्त्यांच्या लेखनातूनही आढळतात. ⇨प्लेटो आणि ⇨ ॲरिस्टॉटल ह्या तत्त्वज्ञांनी सामाजिक जीवनातील प्रश्नांचा विचार केला होता. त्यानंतर ⇨झां बॉदँ, ⇨टॉमस हॉब्ज, ⇨ जॉन लॉक, ⇨ झां झाक रुसो ह्यांनीही व्यक्ती आणि समाज ह्यांच्या संबंधांबाबत चिंतन केले होते. एकोणिसाव्या शतकात फ्रेंच तत्त्वज्ञ ⇨ऑग्यूस्त काँत ह्याने मानवाच्या सामाजिक जीवनाची रचना कशी करता येईल ह्याचा विचार केला. समाजजीवनाच्या स्थित्यंतरावरही त्याने विचार मांडले. विख्यात फ्रेंच समाजशास्त्रज्ञ ⇨एमील द्यूरकेम (१८५८–१९१७) ह्याने समूहाच्या वा सामुदायिक जाणिवेच्या अभिव्यक्तीचे तत्त्व मांडले. इंग्लंडमध्ये ⇨हर्बट स्पेन्सर ह्या तत्त्ववेत्त्याने क्रमविकासाच्या कल्पना सामाजिक विकासाला लावण्याचा प्रयत्न केला. ⇨गाबीएल तार्द (१८४३–१९०४) आणि ल बों (१८४१–१९३१) ह्या दोन सामाजिक विचारवंतांनी समाजजीवनाविषयी महत्त्वाचे लेखन केले.समाजजीवन हे मुख्यत्वेकरून अनुकरणावर अवलंबून असते, हा विचार तार्दने मांडला, तर ल बों याने समूहाच्या वर्तनाचे स्पष्टीकरण ⇨सूचन आणि सूचनक्षमता ह्यांच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला.

विसाव्या शतकाच्या आरंभी सामाजिक मानसशास्त्राला स्वतंत्र अभ्यासक्षेत्राचे स्थान मिळवून देणारे दोन ग्रंथ प्रसिद्घ झाले : (१)⇨ एडवर्ड ॲल्झवर्थ रॉस ह्याचा सोशल सायकॉलॉजी (१९०८) आणि (२) ⇨विल्यम मॅक्डूगल (१८७१–१९३८) ह्याचा ॲन इंट्रोडक्शन टू सोशल सायकॉलॉजी (१९०८). रॉसवर तार्दच्या अनुकरणप्रणालीचा प्रभाव होता. मॅक्डूगलने ⇨सहजप्रेरणांची प्रणाली मांडली. समूहजीवन आणि सामाजिक आंतरप्रक्रिया ह्यांचा आधार म्हणून त्याने काही सहजप्रेरणांची सूचीच दिली.माणसे आणि मानवेतर प्राणी ह्यांच्या कृतींच्या मूलचालक (प्राइम मूव्हर्स) म्हणून त्याने सहजप्रेरणांना महत्त्व दिले.

सी. एच्. कुली ह्याने ह्यूमन नेचर अँड द सोशल ऑर्डर (१९०२) ह्या त्याच्या ग्रंथात व्यक्ती आणि समाज ह्यांच्यातील नात्याच्या अतूटपणाचा मुद्दा मांडला. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कुटुंब, बालोद्यान, प्ले ग्रू प अशा ठिकाणी कसा होतो, हे त्याने सोशल ऑर्गनायझेशन (१९०९) मध्ये दाखवून दिले. ए स्टडी ऑफ द लार्जर माइंड मध्ये शहरीकरण, जलद वाहतूक आणि संदेशवहन, औद्योगिकीकरण आणि विशेषीकरण, वर्गसंघर्ष इत्यादींचा मानवी व्यक्तिमत्त्वावर काय परिणाम होतो, ह्याचे विवेचन केले. आनुभविक (एम्पिरिकल) पद्घतीचा प्रथम वापर १९२० च्या दशकात सुरू झाला. या पद्घतींनी सामाजिक प्रभाव आणि व्यक्तिगत वर्तन यांमधील संबंधांची साधनसामग्री पुरविली. या क्षेत्रात सर्वप्रथम अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात संशोधनास सुरू वात झाली. त्यावेळेपासून सामाजिक मानसशास्त्र ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक प्रणाली वा शास्त्र म्हणून विकासित झाले. साहजिकच अमेरिकेतील संशोधकांचा या क्षेत्रावर अधिकतर प्रभाव जाणवतो.

माणसाच्या भोवतालचा परिसर जसा भौतिक, तसा सामाजिक आणि सांस्कृतिकही असतो. व्यक्तीचा समाजातील अन्य व्यक्तींशी वा व्यक्तिसमूहांशी संपर्क येत असतो. त्यांच्याशी व्यक्तीच्या आंतरक्रिया (इंटरॲक्शन्स) होत असतात. त्या व्यक्तींची काही एक संस्कृतीही असतेच. त्यांची मूल्यव्यवस्था, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोण, रीतिरिवाज, विधिनिषेध, जीवनशैली ह्या संस्कृतीचा भाग असतात. ह्या साऱ्यांचा व्यक्तीवर काही प्रभावही पडत असतो. अशा सामाजिक–सांस्कृतिक आंतरक्रियांमधूनच व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते.

solved 5
सामाजिक Tuesday 11th Oct 2022 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 418 +22