सार्वजनिक खर्च म्हणजे काय?www.marathihelp.com

सार्वजनिक खर्च म्हणजे काय?

सार्वजनिक खर्चाच्या प्रमुख प्रकारांत विकासात्मक खर्च आणि बिगर-विकासात्मक खर्च असे प्रकार मोडतात. विकासात्मक खर्चामध्ये नवे कारखाने, संयंत्रे यांची उभारणी, रस्ते, पूल, रेल्वेबांधणी यांचा समावेश होतो. व्याज, अनुदाने, उपदाने, प्रशासनावरील खर्च, संरक्षणावरील खर्च यांचे वर्गीकरण बिगर-विकासात्मक खर्चात केले जाते.

सार्वजनीक खर्च वाढीची अनेक कारणे आहेत. सरकारी कामातील वाढ, महागाई, लोकसंख्येमध्ये अचानक झालेली वाढ,वाढते शहरीकरण, आपत्तीचे व्यवस्थापन, लोकशाहीचा प्रसार ही काही त्यातील महत्त्वाची कारणे आहेत.
आरोग्य सेवा पुरवणे, त्या सेवांचा प्रसार करणे, शिक्षणाचा प्रसार वाढविणे, सार्वजनिक कामे आणि इतर समाज कल्याणकारी योजना राबवणे, जुन्या योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबवणे आणि नवीन कामे सातत्याने हाती घेणे अशी अनेक कामे सरकार करत असते. याचा परिणाम म्हणून सार्वजनिक खर्चात वाढ होत असते.
महागाई : सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी सरकारला वस्तू व इतर सेवा बाजारातून विकत घ्याव्या लागतात. जर बाजारातील आर्थिक कल वाढता दाखवत असेल तर यामुळे सरकारला वाढती किंमत मोजावी लागते आणि त्यामुळे महागाई वाढते.

लोकसंख्येमध्ये वाढ : विकसनशील देशांमध्ये लोकसंख्येचे प्रमाण झपाट्याने वाढत असते आणि त्या वाढलेल्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी सरकारला जास्त खर्च करावा लागतो.
वाढते नागरिकीकरण : यामुळे रस्ते, पाणी, शाळा, वाहतूक, महाविद्यालये, ऊर्जा इत्यादींच्या सरकारी खर्चात वाढ होते.
आपत्ती व्यवस्थापन : नैसर्गिक आपत्ती तसेच मानवनिर्मित आपत्ती या कायम येत असतात,त्याच्या व्यवस्थापनासाठी सरकार भरपूर पैसे खर्च करते आणि यामुळे एकूण खर्चात वाढ होते.
लोकशाहीचा प्रसार : लोकशाहीतील सरकारी कामे अनेकदा खर्चिक ठरतात कारण लोकशाहीतील निवडणुका, त्यासाठीच्या मोहिमा आणि अशा इतर कामांसाठी भरपूर पैसा खर्च केला जातो. यामुळे सरकारच्या एकूण खर्चामध्ये वाढ होत असते.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 15:15 ( 1 year ago) 5 Answer 6449 +22