सूर्याची ऊर्जा किती आहे?www.marathihelp.com

सूर्यप्रकाश हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मुख्य ऊर्जास्रोत आहे.
पृथ्वीच्या दर एकक पृष्ठभागावर पडणाऱ्या सौर ऊर्जेला सौर स्थिरांक म्हणतात. सौर स्थिरांकाची किंमत ही स्वच्छ वातावरणात एक 'खगोलशास्त्रीय एकक' अंतरावर व सूर्य माथ्यावर असताना दर चौरस मीटरला १३७० वॅट्स (Watts) इतकी आहे. ही ऊर्जा नैसर्गिक तसेच कृत्रिम क्रियांमध्ये वापरली जाते. प्रकाश संश्लेषण या क्रियेत वनस्पती सूर्यप्रकाश शोषून ती ऊर्जा रसायनिक ऊर्जेत परिवर्तित करतात. तर प्रत्यक्ष तापवण्यासाठी किंवा सौरघटांद्वारे ती विद्युतशक्तीमध्ये परिवर्तित करून वापरता येते. पेट्रॊलियम किंवा अन्य जीवाश्म इंधनामध्ये असणारी ऊर्जा ही फ़ार पूर्वीच्या वनस्पतींनी प्रकाश संश्लेषणाद्वारे साठवलेलीच ऊर्जा आहे.

solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 09:21 ( 1 year ago) 5 Answer 1056 +22