हरित क्रांतीचे वारसदार कोण?www.marathihelp.com

हरित क्रांतीचे वारसदार कोण?
वसंतराव नाईक हे हरित क्रांतीचे जनक म्हणून मानले जाते.

भारत हा शेतीप्रधान देश आहे परंतु भारतीय कृषी तंत्रज्ञान अतिशय मागास होते. १९४७ मध्ये भारत पाकिस्तानची फाळणी झाली, त्यात भारताच्या वाटेला ८२% लोकसंख्या ७५% तृणधान्याखालील क्षेत्र व ६९% बागायत क्षेत्र आले. स्वातंत्र्योत्तर काळात भारत शेतीप्रधान देश असून ही पीएल ४८० करारानुसार १९५५ मध्ये अमेरिकेकडून गहू आयात करावा लागला. हरितक्रांती म्हटले की, हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचे नाव नजरेसमोर येतो. पुणे येथील शनिवारवाडा येेथील जाहीर सभेत "जर या दोन वर्षात राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले नाही, तर या शनिवारवाडा समोर मी जाहिर फाशी घेईन" अशी भिष्मप्रतिज्ञा केली. आणि अल्पावधीतच त्यांनी हरितक्रांती घडवून आणली. महाराष्ट्रात १९७२ एवढा भिषण असा दुष्काळ यापूर्वी कधीही पडला नव्हता,अशा भिषण दुष्काळावरही त्यांनी मात केली.

भारतातील हरितक्रांती

इ.स.१९६० च्या दशकात शेतकी संशोधन, विकास, तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतात कृषिउत्पादन वाढले. हा काळ भारतातील हरितक्रांती म्हणून ओळखला जातो. त्यांच्या सहकार्याने जास्त उत्पन्न देणारे जातींची बियाणांचा विकास, सिंचनाच्या पद्धतींचा विस्तार, व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण, संकरित बियाणांचे, कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण इत्यादी मार्गांवर यात भर देण्यात आला. भारताच्या कृषिमंत्रालयाचे तत्कालीन सल्लागार एम.एस. स्वामिनाथन यांनी डॉ. नॉर्मन बोरलॉगांना भारतात बोलावले. अमेरिकेतील फोर्ड फाऊंडेशन आणि भारती केंद्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून मेक्सिकोमधील आंतरराष्ट्रीय मका व गहू विकास केंद्रातून गव्हाचे बियाणे आयात करण्यात आले. पाण्याची मुबलक उपलब्धता व शेतकीची सफल पार्श्वभूमी यांमुळे भारतीय केंद्रशासनाने नवी पिकांच्या प्रयोगांसाठी पंजाबची निवड केली. अधिक उत्पन्न देणारी बियाणी व जलसिंचनाच्या वाढत्या वापराद्वारे भारतातील अन्नधान्याचे उत्पादन वाढले. मात्र कालौघात रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या अतिरिक्त वापरामुळे शेतजमिनींवर विपरीत परिणाम झाले.

महाराष्ट्रातील हरितक्रांती

महाराष्ट्रातील हरित क्रांतीची सुरुवात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केली होती. ते हाडाचे प्रगतशील शेतकरी होतेे.कृषीतज्ञ होते. शेती आणि मातीवर निस्सीम भक्ती होती. वसंतराव नाईक हे हरित क्रांतीचे जनक म्हणून मानले जाते.


solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 15:04 ( 1 year ago) 5 Answer 8299 +22