२ मागणी म्हणजे काय मागणीचे निर्धारक घटक स्पष्ट करा?www.marathihelp.com

मागणी म्हणजे काय?
वस्‍तूंची मागणी निर्धारित करणारा महत्‍त्‍वपूर्ण घटक म्‍हणजे किंमत होय. उपभोक्‍ते जेव्हा वस्‍तूंची किंमत कमी असते तेव्हा अधिक प्रमाणात वस्‍तू खरेदी करतात आणि जेव्हा वस्‍तूंची किंमत अधिक असते तेव्हा कमी प्रमाणात वस्‍तू खरेदी करतात. २) उत्‍पन्न : उपभोक्‍त्‍यांच्या उत्‍पन्नाचा खरेदीशक्‍तीवर परिणाम होतो.


मागणीचे निर्धारक घटक :


1] किमत ( price ) :- 

वस्तूच्या मागणीवर परिणाम करणारे सर्वात महत्वाचा घटक म्हणजे वस्तूची किंमत होय . उपभोक्ते (consumers) जेव्हा वस्तूची किंमत कमी असते तेव्हा अधिक प्रमाणात वस्तूची खरेदी करतात . आणि जेव्हा वस्तूची किंमत अधिक असते तेव्हा कमी प्रमाणात वस्तू खरेदी करतात .

2 ] उत्पन्न ( income ) :-

मागणीवर परिणाम करणारे आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे उत्पन होय सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या उत्पन्नवर देखील मागणी अवलंबून असते . उत्पन्न वाढल्यास अधिक वस्तू व सेवांना मागणी होते . तर उत्पन्न कमी झाले असून मागणीही कमी होते . सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या वाढत्या उत्पन्नाबरोबर मागणी वाढते .

3 ] पर्यायी वस्तूच्या किमती ( optional commodity prices ) :- 
 
जर कमी किमतीत पर्याय उपलब्ध असतील तर व्यक्ती महाग वस्तू पेक्षा स्वस्त व पर्यायी वस्तूंची मागणी करतील . उदा . साखर आणि गूळ जर साखरेच्या किमतीत वाढ झाली तर गुळाची मागणी वाढेल . 

4 ] पूरक वस्तूच्या किमती ( Supplementary Prices ) :-

एका वस्तूच्या किमतीत बदल झाल्यास त्याचा परिणाम (impact) इतर वस्तूच्या मागणीवर होतो . उदा . कार आणि इंधन (Fuel) जर इंधनाच्या किमतीत वाढ झाली तर कारची मागणी कमी होईल . 

5 ] वस्तूचे स्वरूप ( The nature of the object ) :-

जर एखाद्या वस्तूचा उपभोग अत्यावश्यक (Essential) तर त्या वस्तूची मागणी किमतीशी निगडित (Related) न राहता स्थिर राहील उदा . मधुमेह नियंत्रणाच्या औषध . या वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे त्याच्या मागणीत काही बदल होत नाही . ती स्थिर राहते . वस्तूची मागणीही वाढत ही नाही किंवा कमी पण होत नाही . ती स्थिर राहते . किमतीचा मागणीवर परिणाम होत नाही . 

6 ] लोकसंख्येचा आकार ( Population size ) :-

लोकसंख्येचे आकारमान जास्त असेल तर तेव्हा वस्तूची मागणी जास्त प्रमाणात होत असते . आणि लोकसंख्येचे आकारमान कमी असले तेव्हा वस्तूची मागणी ही कमी प्रमाणात होत असते . लोकसंख्या जास्त तर मागणी जास्त लोकसंख्या कमी तर मागणी पण कमी असते .

7 ] भविष्यकालीन किमतीचा अंदाज (Future price forecast) :- 

भविष्यकालीन अंदाजावर वस्तूची मागणी अवलंबून असते . उदाहरणार्थ एखाद्या वस्तूची किंमत भविष्यात कमी होईल असा उपभोक्त्याचा अंदाज असेल तर त्या वस्तूची वर्तमानकालीन मागणी कमी होते . याउलट एखाद्या वस्तूची किंमत भविष्यात जास्त होईल असा उपभोक्त्याचा अंदाज (Guess) असेल तर वस्तूची वर्तमानकालीन मागणी जास्त होते .

8 ] जाहिरात (Advertising) :-

सध्या परिस्थिती जाहिरात हा वस्तूची मागणी निर्धारित करणारा महत्त्वपूर्ण घटक आहे . ज्या वस्तूची रेडिओ , दूरदर्शन , वर्तमानपत्रात जाहिरात केली जाते . अशा वस्तूच्या मागणीत वाढ होते उदा . सौंदर्यप्रसाधने , टूथब्रश इत्यादी 

9 ] आवडीनिवडी , सवयी व फॅशन (Preferences, habits and fashion) :- 

उपभोक्त्याच्या आवडी-निवडी आणि सवयीचा मागणीवर प्रभाव पाडतो . उदाहरणार्थ चॉकलेटची आवड आणि चहाची सवय इत्यादी त्याचप्रमाणे जेव्हा बाजारात नवीन फॅशन येते तेव्हा उपभोक्ता त्या प्रकारच्या वस्तूची मागणी करतो . परंतु जेव्हा फॅशन कालबाह्य होते . त्यानंतर अचानक त्या वस्तूची मागणी कमी होते . 

10 ] कररचना (Tax structure) :-

वस्तू व सेवांवर जास्त कर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत वाढून मागणी कमी होईल . आणि वस्तू व सेवांवर कमी कर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत कमी होऊन मागणी वाढेल . 

11 ] इतर घटक (Other factors) :-

1) नैसर्गिक परिस्थिती [Natural conditions] :-

2) तंत्रज्ञानातील बदल [Changes in technology] :-

3) सरकारी धोरण [Government policy] :-

4) रुढी-परंपरा इत्यादी [Tradition] :-

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 15:45 ( 1 year ago) 5 Answer 7226 +22