● राष्ट्रीय सभा कधी अस्तित्वात आली?www.marathihelp.com

राष्ट्रीय सभा कधी अस्तित्वात आली?
स. १८८५ मध्ये ब्रिटिश राजाच्या काळी झाली; एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी स्थापन केली. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन २८ डिसेंबर १८८५ रोजी 'इंडियन नॅशनल काँग्रेस' म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली.


राष्ट्रीय सभेची स्थापना

राष्ट्रीय जागृती होऊ लागल्यामुळे भारताच्या वेगवेगळ्या प्रांतील राजकीय चळवळी सरू झाल्या होत्या. त्याला अखिल भारतीय स्वरूप देण्याचे प्रयत्नही या काळात सुरू झाले. इंडिअन असोसेशिअन संघटनेने कोलकता येथे अखिल भारतीय परिषद भरवली. या प्रयत्नात राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची कल्पना पुढे आली.

दादाभाई नौरोजी, बदृदिन तय्यबजी, फिरोजशहा मेहता इत्याही भारतीय नेत्यांना असे वाटू लागले, की राष्ट्रीय पातळीवर एखादी संघटन असावी. त्यांनी निवृत्त ब्रिटिश अधिकारी सर अॅलन् हयूम याच्या सहकार्याने इंडियन नॅशनल काँग्रेसची म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केली.

 राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन : राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबई येथे भरले होते. दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, पी. रंगय्या नायडू, गोपाळ गणेश आगरकर इत्यादी नेते त्यात सहभागी होते. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी व्योमेशचंद्र बॅनर्जी होते. अधिवेशनात देशापुढील अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली. या पुढील काळात राष्ट्रीय सभेची अधिवेशने प्रत्येक वर्षी निरनिराळ्या शहरांत भरू लागली. राष्ट्रीय सभेला लोकांचा पाठिंबा वाढत गेला. सर्व धर्माच्या लोकांना राष्ट्रीय चळवळीत एकत्र आणण्याचा राष्ट्रीय सभेचा प्रयत्न होता.

व्योमेशचंद्र बॅनर्जी
 
भारतीयांची ही एकजूट ब्रिटिश सरकारला धोकादायक वाटू लागली शासकीय सेवेत असलेल्या भारतीयांनी राष्ट्रीय सभेच्या सभांना हजर राहू नये, असा नियम सरकारने केला. मुस्लिम समाजाने राष्ट्रीय सभेत सहभागी होणे त्यांच्या हिताचे नाही, असा प्रचार ब्रिटिशांनी सुरू केला; परंतु याचा फारसा परिणाम बद्रदुद्दीन तय्यबजी यांच्यासारख्या नेत्यांवर झाला नाही. ब्रिटिशांच्या धोरणामुळे भारतीयांची होणारी पिळवणूक आणि त्यांचे वाढते दारिद्र्य यांवर राष्ट्रीय सभेने आपले लक्ष केंद्रित केले. सरकारी नोक-यांत भारतीयांना स्थान मिळावे, शेतक-यांवरील कराचा बोजा कमी करावा, अशा प्रकारच्या मागण्या त्यांनी केल्या.


अधिवेशनाचे ठिकाण अध्यक्ष व वर्ष 

१.व्योमेशचंद्र बॅनर्जी - मुंबई -१८८५

२. दादाभाई नौरोजी - कोलकता - १८८६

३. बदुद्दीन तय्यबजी - चेन्नई - १८८७

४.सर विल्यम वेडरबर्न - मुंबई - १८८९

५. जॉर्ज युल - अलाहाबाद - १८८८

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 12:27 ( 1 year ago) 5 Answer 7511 +22