बाबरी मशीद-रामजन्मभूमी प्रकरणाच्या निकालापर्यंत न्यायाधीशांची निवृत्ती नाही?

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली

बाबरी मशीद प्रकरणावर निकाल जाहीर झाल्यानंतरच विशेष न्यायाधीशांनी निवृत्त व्हावे, अशी ईच्छा सर्वोच्च न्यायालयाने आज व्यक्त केली आहे. बाबरी मशीद प्रकरणाच्या अंतिम सुनावणीसाठी विशेष न्यायाधीशांनी आणखी सहा महिन्यांचा वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने संबंधित प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

हे वाचलंत का? राम मंदिरासाठी संसदेने कायदा करावा : रामदेव बाबा

बाबरी मशीद-रामजन्मभूमी या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींसह इतर अनेक नेत्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. यासाठी विशेष न्यायाधीशांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या विशेष न्यायाधीशांनी प्रकरणाच्या अंतिम सुनावणीसाठी आणखी सहा महिन्यांच्या कालावधीची मागणी केली आहे. या प्रकरणाच्या एका सुनावणीदरम्यान विशेष न्यायाधीशांनी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत निवृत्त होणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नरीमन यांच्या खंडपीठापुढे हे प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. यावेळी बाबरी मशीद-रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत विशेष न्यायाधीशांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी काय करता येईल याची माहिती १९ जुलैपर्यंत देण्यात यावी, असे आदेश उत्तर प्रदेश सरकारला देण्यात आले आहेत.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here