एसबीआयच्या वेळांत बदल, जाणून घ्या तुमच्या शाखेची वेळ

ब्रेनवृत्त, २३ मे

जर आपण भारतीय स्टेट बँक (एसबीआय) चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता एसबीआयने आपल्या बँकांच्या शाखांच्या वेळा बदलल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे भान राखणे जरुरी आहे तसेच टाळेबंदी (लॉकडाऊन) मुळे बँकेतील कर्मचारीही कमी आहेत. त्यामुळे एसबीआयने बँकेतील वेळांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खूपच गरज असेल तरच बँकेत जा, अन्यथा बँकेने दिलेल्या डिजिटल सेवांचा वापर करण्याचा सल्ला बँकेने दिला आहे.

एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दृष्टीने या वेळांत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे यानंतर देशातील अनेक राज्यांत सकाळी 7 ते 10 या वेळेत शाखा सुरू होतील. काही ठिकाणी 8 ते 11 या वेळेत बँका सुरु असतील, तर काही ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी २ या नव्या वेळेत बँका सुरु राहतील. आपल्या बँकेची नवीन वेळ जाणून घेण्यासाठी Link या संकेतस्थळावर क्लिक करा.

दरम्यान, एसबीआयने घरपोच सेवाही (Doorstep Banking) सुरू केली आहे. यात कॅश पिकअप, कॅश डिलिव्हरी, चेक पिकअप, चेक रिजेक्शन स्लिप पिकअप, फॉर्म 15 एच पिकअप, ड्राफ्ट डिलिव्हरी, टर्म डिपॉझिट अ‍ॅडव्हिजन डिलिव्हरी, लाइफ सर्टिफिकेट पिकअप आणि केवायसी डॉक्युमेंट्स पिकअप अशा सेवांचा समावेश आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

ही सेवा मिळविण्यासाठी तुम्हाला बँकेच्या कामाच्या दिवशी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत 1800111103 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा लागेल. यासाठी होम ब्रँचमध्ये नोंदणी सेवेची विनंती करायची आहे. मात्र, केवायसी केलेल्या ग्राहकांनाच डोअरस्टेप बँकिंग सेवा उपलब्ध असेल. आर्थिक व्यवहार नसलेल्या सेवांसाठी 60 रुपये शुल्क, तर जीएसटी आणि आर्थिक व्यवहारांसाठी सेवा शुल्क 100 रुपये आणि जीएसटी असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here