कल्याण पूर्वेतील जिम्मीबागेत दुकानफोडीची घटना

ब्रेनवृत्त | गोपाळ दंडगव्हाळे

कल्याण, 25 सप्टेंबर

कल्याण पूर्व भागातील जिम्मीबागेच्या परिसरात काल उशिरा रात्री सौंदर्य प्रसाधनांच्या दुकान फोडीची घटना घडली. जिम्मीबागेतील गायत्री विद्यालयाच्या जवळील ‘अर्चना ब्युटी अँड लेडीज शॉपी’ या सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानात दुकान फोडीची व चोरीची घटना घडली आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये सापडली अर्धवट जळलेली मतदान ओळखपत्रे

मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांच्या टोळीने लोखंडी गजाच्या साहाय्याने ब्युटी शोपीचे शटर उचकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केले. त्यानंतर दुकानातील सौंदर्य प्रसाधनांच्या साहित्यांची चोरी करून दुकानाची तोडफोड केली. चोरट्यांचा या दुकानफोडीच्या प्रकरणात जवळपास दोन ते तीन हजाराच्या मालाची चोरी झाल्याचे दुकान मालकांकडून सांगण्यात आले आहे.

अर्चना ब्युटी लेडीज शॉपी या दुकानाची फोडी करून चोरांनी मुद्देमाल लंपास केला

सदर घटनेची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे मालकाचे नुकसान कमी प्रमाणात झाले असले, तरी ऐन सणासुदीच्या दिवसांत घडणाऱ्या अशा घटनांमुळे स्थानिक दुकानदार व व्यवसायिकांच्या चिंतेत मात्र वाढ ननिर्माण झाली आहे.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here