गोंदिया नगरपरिषदेतील कंत्राटी अभियंता व नियोजन सभापती एसीबीच्या जाळ्यात

ब्रेनवृत्त | प्रतिनिधी

गोंदिया, ९ जुलै

भूखंडाचा स्थायी अकृषक परवाना बनवून देण्याचा मोबदल्यात ८ हजार रुपयांची लाच घेण्याची तयारी  दर्शवल्या प्रकरणी गोंदिया नगर परिषदेच्या नगर रचना विभागातील कंत्राटी अभियंता व नियोजन-विकास सभापती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. त्या दोघांविरुद्ध गोंदिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोंदिया नगर परिषदेतील नगर रचना विभागात काल लाच घेण्याचे प्रकरण उघडकीस आले. व्यवसायाने विमा एजंट असलेल्या तक्रारदाराचे कुडवा येथे स्वतःच्या मालकीचे भूखंड (प्लॉट) आहे. सदर भूखंडाचा स्थायी अकृषक परवाना करवण्याच्या उद्देशाने ती व्यक्ती गोंदिया नगर परिषदेत गेल्यावर मोबदल्यात संबंधित अधिकाऱ्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. आवश्यक दस्तऐवज सादर केल्यानंतरही नगर रचना विभागातील कनिष्ठ कंत्राटी अभियंता शशी छोटेलाल पारधी यांनी ८ हजार रुपयांची लाच घेण्याची ईच्छा दर्शवली. यासंबंधी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार नोंदवल्यानंतर विभागाद्वारे कारवाई करण्यात आली व त्याब्यात घेण्यात आले.

दरम्यान, विदर्भ न्यूज एक्सप्रेस  ने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार काल, ८ जुलैच्या रात्री नियोजन व विकास सभापती सचिन शेंडे याने तक्रारदाराला भूखंडाचा स्थायी अकृषक परवाना आणून दिला व त्या मोबदल्यात ८ हजारांच्या लाचेची मागणी केली. या दोघांविरुद्ध गोंदिया पोलीस ठाण्यात लाचलुचपत कायद्यायाच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here