‘ई-नाम’ (e-NAM) म्हणजे काय? हे कसे काम करते?

देशभरातील 38 कृषी उत्पन्न बाजारपेठा ‘राष्ट्रीय कृषी बाजार’ (NAM : National Agricultural Market ) किंवा ‘ई-नाम ( e-NAM)’ पोर्टलशी आज जोडल्या गेल्या असून, त्यायोगे एकूण ४१५  कृषी उत्पन्न बाजारपेठा जोडल्या जाण्याचा नियोजित टप्पा गाठला आहे.

ब्रेनबीट्स | ई-राष्ट्रीय कृषी बाजार 

देशभरातील 38 कृषी उत्पन्न बाजारपेठा ‘राष्ट्रीय कृषी बाजार’ (NAM : National Agricultural Market ) किंवा ‘ई-नाम ( e-NAM)’ पोर्टलशी आज जोडल्या गेल्या असून, त्यायोगे एकूण ४१५  कृषी उत्पन्न बाजारपेठा जोडल्या जाण्याचा नियोजित टप्पा गाठला आहे.  यात मध्यप्रदेश(१९), तेलंगणा (१०), महाराष्ट्र (४ ) याबरोबर गुजरात, हरयाणा, पंजाब, केरळ आणि जम्मू-काश्मिरमधील प्रत्येकी एक अशा एकूण 38 बाजारपेठांचा समावेश आहे .

मागील महिन्यात पहिल्या टप्प्यात ५८५ आणि आता दुसऱ्या टप्प्यात नव्या ४१५ कृषी उत्पन्न बाजार समित्या जोडल्या गेल्याने आता १८ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण एक हजार बाजारपेठांचा या पोर्टलमध्ये समावेश झाला आहे. ‘ई-नाम पोर्टल’ हे छोट्या कृषीउत्पन्न व्यापारी संघटनानी (SFAC : Small Farmers Agricultural Consortium) अनुसरल्यामुळे, तसेच त्याला सर्व राज्ये आणि, के़ंद्रशासित प्रदेशातील पणनमंडळे, बाजारपेठांतील सचिव, देखरेखतज्ञ, दर्जा मानक तज्ञ, वजन करणारे, सेवापुरवठादार, शेतकरी, व्यापारी आदींनी स्विकारल्यामु़ळे भारत सरकारच्या ‘कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालया’ अंतर्गत येणारे सर्वात मोठे पोर्टल बनले आहे.

‘इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार (e-NAM )’ पोर्टलचे उद्घाटन 14 एप्रिल 2016 रोजी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. ‘एक राष्ट्र एक बाजार’ (One Nation One Market) असा कृषीमालाच्या विक्रीसाठी संपूर्ण देशभरात एकच  सामायिक मंच असावा, या उद्देशाने याची स्थापना झाली होती.

● थेट शेतकरी आणि ग्राहकांमध्ये होतो व्यवहार 

‘ई-नाम ( e-NAM)’ हे ऑनलाईन पोर्टल देशभरातील शेतकरी, व्यापारी, खरेदीदार यांना एकत्र आणणारे आणि सर्वोत्तम भाव, योग्य बाजारपेठ  मिळवून देणारे पोर्टल आहे. पोर्टलचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे, आपल्या स्थानिक शेतमालाला देशभरात पोहचवणे हा आहे. सुरुवातीच्या या दोन टप्प्यांत साधारण २२ कोटी शेतकरी या पोर्टलच्या मदतीने आपला शेतमाल देशाच्या निरनिराळ्या बाजारांमध्ये विकत आहेत. हा सर्व  व्यवहार उत्पादक शेतकरी आणि थेट ग्राहकांमध्ये होत असल्यामुळे यात कोणत्या मध्यस्थांची गरज नसते. त्यामुळे कमी खर्चात आपला माल ग्राहकांकडे पोहचत असल्याने शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत असतो.

● ‘ई-नाम शी  शेतकरी कसे जोडले जातील ?
enam.gov.in. या संकेतस्थळावर जाऊन तेथील सर्चबारमध्ये ‘नोंदणी’ (Registration) या पर्यायाला क्लिक करा. त्यानंतर ‘शेतकरी (Farmer)’ हे पर्याय निवडल्यावर लॉन इन करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या इ-मेलवर तुम्हाला तात्पुरते लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल. याच्या आधारे तुम्ही लॉगिन करु शकता. लॉगिन केल्यानंतर सुरु होणाऱ्या डॅशबोर्डमध्ये तुम्ही आपल्या कागदपत्रांची नोंदणी करु शकता. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून यास मान्यता मिळाली की, तुम्ही व्यवहार करण्यास सुरुवात करु शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here