पॅरिस जवळी व्हर्साय येथे राजवाडा बांधणारा राजा कोण?www.marathihelp.com

फ्रान्सचा राजा तेराव्या लुईच्या कार्यकाळात अंदाचे इ. स. १६२४ मध्ये ह्या प्रासादाच्या बांधकामास सुरुवात झाली. ह्या काळात व्हर्साय हे पॅरिसजवळ असलेले एक छोटे गाव होते.

व्हर्सायचा राजवाडा हा फ्रान्स देशाच्या व्हर्साय शहरामधील एक ऐतिहासिक राजवाडा आहे. फ्रान्सचा राजा तेराव्या लुईच्या कार्यकाळात अंदाचे इ.स. १६२४ मध्ये ह्या प्रासादाच्या बांधकामास सुरुवात झाली. ह्या काळात व्हर्साय हे पॅरिसजवळ असलेले एक छोटे गाव होते. चौदाव्या लुईने ह्या राजवाडाच्या मोठ्या प्रमाणावर विकास केला व ६ मे १६८२ रोजी आपला निवास अधिकृतपणे येथे हलवला व फ्रान्सची राजधानी पॅरिसहून व्हर्साय येथे आणली गेली. पुढील १०० वर्षांहून अधिक काळादरम्यान व्हर्साय हे फ्रान्सचे राजकीय केंद्र होते. १७८९मध्ये फ्रेंच क्रांती सुरू झाल्यानंतर शाही घराण्याला व्हर्सायहून पुन्हा पॅरिसला पळ काढावा लागला व व्हर्सायचे राजकीय महत्त्व संपुष्टात आले.
व्हर्सायच्या राजवाड्याचे हवाई दृष्य

सध्या व्हर्साय हे फ्रान्समधील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. १९७९ साली युनेस्कोने व्हर्सायच्या राजवाड्याला जागतिक वारसा स्थानांच्या यादीमध्ये समाविष्ट केले.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 12:16 ( 1 year ago) 5 Answer 6149 +22